आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्याच घरात झाली बेअब्रू; \'मी काही सेक्स रॅकेट चालवत नाही\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमधील ८० च्या दशकातील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री दिप्ती नवल आणि अभिनेता फारूख शेख यांना त्यांच्या सोसायटीच्या सदस्यांनी अपमानीत केले आहे. अंधेरी येथील राहाते घर सोडून दिप्ती नवल सध्या दुस-या अपार्टमेंटमध्ये गेल्या आहेत. दिप्ती नवल यांना त्यांच्या सोसायटीतील सदस्यांनी त्या एखादे सेक्स रॅकेट चालवत असल्यासारखी वागणूक दिली आहे.

शुक्रवारी फारुख शेख आणि दिप्ती यांची त्यांच्या निवसास्थानी एका टीव्ही चॅनलसाठी मुलाखत सुरू होती. त्याचवेळी सोसायटीचे सदस्य तिथे आले आणि त्यांनी सोसायटीमध्ये असले प्रकार चालणार नाहीत असे त्यांना सुनावले. ही निवासी सोसायटी असून इथे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. माध्यमांना इथे बोलावून मुलाखती देणे सोसायटीच्या नियमांविरुद्ध असल्याचे त्यांनी दिप्ती यांना सुनावले.