आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील पहिले \'IIT\'ian CM, स्कूटरवर जायचे 5 स्टार हॉटेलमध्ये...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारीच आपल्या वयाची 60 वर्षे पूर्ण केली. यानिमित्त गोव्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले होते. पर्रीकर साधेपणाने राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र ते कधीही हे कोणाला सांगत नाहीत की गाजावाजा करीत नाहीत. ते वाढदिवसही साजरा करीत नाहीत. मात्र, 60 वा वाढदिवस साजरा करण्यास त्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी होकार दिला. रविवारी पर्रीकर यांना गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मंत्री नितीन गडकरी यांनी सन्मानित केले.
पर्रीकर यांनी गेल्या वर्षी संरक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यशवंतराव चव्हाण, शरद पवार व प्रमोद महाजन (केवळ 13 दिवस) यांच्यानंतर ते चौथे मराठी संरक्षणमंत्री ठरले आहेत. मुंबईतील (पवई) आयआयटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले पर्रिकर यांची ओळख एक प्रामाणिक व कार्यक्षम नेता अशी आहे. प्रशासनावर असणारी मजबूत पकड ही त्यांची जमेची बाजू आहे. निर्णय घेण्यास सक्षम, उत्साही व उमदे नेतृत्त्व, संघाची तनामनात असलेली शिस्त आदी बाबींसह पर्रिकरांची स्वच्छ प्रतिमा पंतप्रधान मोदींच्या नजरेत भरली होती. त्यामुळेच मोदींनी त्यांना संरक्षण सारखे संवेदनशील खाते दिले आहे.
साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत पर्रिकर-
गोव्याचे दोनदा मुख्यमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर आपल्या साध्यापणासाठी प्रसिद्ध आहेत. 2000 साली ते सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी दुस-यांदा या पदाची शपथ घेतली. गोव्यातील सर्वोच्च पद हातात असतानाही आपल्या राज्याचा दौरा करताना आपल्या आमदारांसोबत ते खासगी वाहनाने प्रवास करायचे. त्यातही स्कूटरचा वापर करायचे. मुख्यमंत्री म्हणून ते कोणत्याही सरकारी अथवा खासगी कार्यक्रमात जातात तेव्हा ते सामान्य कपडे घालतात. याबाबत पर्रीकर यांच्या जवळच्या व्यक्तीने सत्य घडलेली घटना सांगितली ती अशी की, पर्रिकर एकदा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये चालले होते. मात्र त्याचवेळी त्यांची कार खराब झाली. त्यांनी तत्काळ एक खासगी टॅक्सी बोलावली व साधे कपडे व चप्पल घातलेले मुख्यमंत्री हॉटेलवर पोहचले. जेव्हा ते टॅक्सीतून उतरले व हॉटेलच्या गेटकडे जावू लागले तेव्हा त्यांना सुरक्षारक्षकांनी आडवले व सांगितले तुम्ही आता जाऊ शकत नाही. तेव्हा पर्रिकरांनी मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे असे सांगितले त्यावर तो सुरक्षारक्षक जोरजोरदार हसू लागला व म्हणाला, तुम मुख्यमंत्री है तो मैं देश का राष्ट्रपती हूं. इतक्यात कार्यक्रमाचे आयोजक तेथे पोहचले व पुढील प्रकरण थांबले.
पर्रीकर मुंबईतील पवई आयआयटीचे पदवीधर-
मनोहर पर्रिकर यांच्या नावावर देशातील पहिला आयआयटीयन मुख्यमंत्री होण्याचा विक्रम आहे. मुंबईतील पवई आयआयटीचे ते पदवीधर आहेत. पर्रिकर यांच्यानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे सुद्धा आयआयटी पदवीधर आहेत. जे सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत.
पुढे आणखी वाचा, मनोहर पर्रीकर यांच्याविषयी...
बातम्या आणखी आहेत...