आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defence Ministry Opposes Ashok Chavan Petition In Aadarsh Case

आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाणांच्या याचिकेला संरक्षण खात्याकडून विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आदर्श घोटाळ्यातून आरोपी म्हणून नाव मागे घेण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला संरक्षण खात्याने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे चव्हाणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याआधी सीबीआयनेही त्यांच्या याचिकेला विरोध दर्शवला होता.

आदर्श घोटाळ्याची चौकशी करणे सीबीआयच्या कार्यक्षेत्रात बसत नाही, असा दावा चव्हाण यांनी याचिकेत केला आहे. यावर संरक्षण खात्याने शुक्रवारी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेत चव्हाण यांचे म्हणणे खोडून काढले आहे. तसेच या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करू शकते, असे संरक्षण खात्याच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत सीबीआयकडे तक्रार करण्यात आली असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सिंग यांनी आदर्श घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या सीबीआयवर लक्ष ठेवण्याबाबत अलीकडेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण मुख्य आरोपी आहेत.