आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विद्यापीठाने हरवल्या तब्बल २८ हजार उत्तरपत्रिका; 57 हजार विद्यार्थ्यांचे िनकाल अजूनही अधांतरीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या नामवंत अशा मंुबई विद्यापीठाचे रोज नवे नवे प्रताप समोर येत आहेत. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतील तांत्रिक अडचणीमुळे निकालाच्या चार डेडलाइन पाळता न आलेल्या मुंबई विद्यापीठाचा नवा कारभार खुद्द प्रभारी कुलगुरूंनी सांगितला आहे. तो म्हणजे िवद्यापीठाने २८ हजार उत्तरपत्रिका चक्क हरवल्या असल्याचा.   

मागच्या दोन महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या निकालाचा सुरू असलेला गोंधळ  थांबवण्याचे नाव घेत नाही. अद्यापही आठ परीक्षांचे म्हणजे ५७ हजार विद्यार्थ्यांचे निकाल अंधातरीच आहेत. प्रलंबित निकाल कधीपर्यंत लागतील याची डेडलाइन देण्यास विद्यापीठाने नकार दिला आहे. त्यामुळे निकालाचा गोंधळ अजून काही दिवस चालणार हे नक्की झाले आहे.    

सोमवारी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डाॅ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. अद्यापही ५७ हजार िवद्यार्थ्यांचे निकाल बाकी आहेत. माझ्याकडे ९ ऑगस्ट रोजी प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार आला. त्यानंतर  ३ लाख ९५ हजार ६२२ विद्यार्थ्यांचे म्हणजे १८० परीक्षांचे निकाल बाकी होते. कामकाजाच्या २० दिवसांत आपण १७२ परीक्षांचे निकाल लावले असून आता केवळ ८ निकाल बाकी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.   निकालाच्या चार डेडलाइन हुकवल्या असताना आणि लाखो िवद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला असतानाही ‘मुंबई विद्यापीठाने इतर विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ऑनलाइन पेपर तपासून नवा पायंडा पाडला आहे’ असा दावा शिंदेंनी केला.  
बातम्या आणखी आहेत...