आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर निर्मितीच्या प्रक्रियेला गती देणारे एक महत्त्वाचे पाऊल राज्य सरकार उचलत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात तीन मार्चला एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी होत आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आनंद शर्मा, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमूख उपस्थितीत सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर महाराष्ट्र सरकार, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) ट्रस्ट आणि एमआयडीसी यांच्यात शेअर होल्डिंग आणि स्टेट सपोर्ट अँग्रीमेंटवर स्वाक्षर्या करण्यात येणार आहेत. राज्य सरकार या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची लिखित हमी या कराराद्वारे देणार आहे. या करारानंतर या प्रकल्पाचा पहिला टप्पा प्रत्यक्ष आकाराला येण्याची सुरुवात होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.