आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Blue Whale गेमबाबत गूगल, फेसबुक गंभीर नाही, मुंबई हायकोर्टाने एका सप्ताहात मागितले उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आत्मघातकी ऑनलाईन गेम ब्लू व्हेलवर बंदी घालण्याच्या मागणीवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने यावर फेसबुक आणि गुगलकडून एक आठवड्यात उत्तर मागितले आहे. 
 
गूगल आणि फेसबुकला मिळाली नोटीस
मुख्य न्यायाधीश मंजुला चिल्लूर व न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर या विषयावर सुनावणी सुरु आहे. यावर बोलताना गूगल आणि फेसबुकच्या वकिलांनी याबाबत आपल्याला नुकतीच नोटीस मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्याला उत्तर देण्यास वेळ लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने गुगल आणि फेसबुक याप्रकरणी गंभीर नसल्याचे मत व्यक्त केले. सिटीझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर या बिगर सरकारी संस्थेच्या वतीने शहजाद नक्वी यांनी ब्लू व्हेलवर बंदी घालण्यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.
 
याचिकेत काय म्हटलंय 
याचिकेत म्हटले आहे की ऑनलाईन उपलब्ध असणाऱ्या सर्व गेम्सची तपासणी करुन ज्या धोकादायक आहेत त्यावर तातडीने बंदी घातली पाहिजे. देशात लहान मुलांना ब्ल्यू व्हेलसारख्या गेमचे व्यसन लागू लागले आहे. त्यामुळे मुलांचे जीव जाऊ लागले आहेत. राज्यातही या गेममुळे 2 मुलांची जीव गेला आहे. मध्य प्रदेशातही या 11 वीत शिकणाऱ्या मुलाने जीव दिला आहे.
 
हेल्पलाईन सुरु करण्याची मागणी
देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये यामुळे मुलांचे जीव गेले आहेत. त्यामुळे याचिकेत यासाठी एक हेल्पलाईन सुरु करण्याची मागणीही करण्यात आली आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...