आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला अधिका-यासमोर संतप्‍त व्‍यक्‍ती झाला विवस्त्र, वाचा काय होती त्‍याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालघर - रेशन कार्ड वेळेवर न दिल्यामुळे संतापलेल्‍या एका वृद्धाने चक्‍क तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यासमोरच स्वत:चे कपडे काढले. वसईमधील या वृद्धाने पालघर तहसील कार्यालयात हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.

वसई पोलिस स्टेशनचे ड्यूटी अधिकारी एस. एम. पाटील यांच्या माहितीनुसार, वृद्ध इसम भावासोबत तहसील कार्यालयात गेला होता. आईचे रेशन कार्ड देण्‍यासंदर्भात त्‍याने महिला कर्मचा-याकडे मागणी केली. तत्‍काळ रेशनकार्ड द्या अन्‍यथा आम्‍ही येथेच कपडे काढू अशी धमकीच त्‍यांनी दिली होती. त्‍यानंतर दोघांपैकी एकाने शर्ट काढले नंतर पँट. एवढे करूनही तो थांबला नाही, तर अंतर्वस्‍त्र काढून त्‍याने महिलेसमोर गैरवर्तन केल्‍याचे पाटील यांनी सांगितले. या दोघांविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे.