आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Demand Of Rs 2 Thousand Core For Suffer From Drought

दुष्काळ, गारपीटग्रस्‍तांसाठी केंद्राकडे २ हजार कोटींची मागणी- एकनाथ खडसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठवाड्यासह राज्यात दुष्काळ व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्याने ३९२५ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, ही मदत तोकडी पडत असल्याने केंद्राकडे अजून २ हजार कोटींची आर्थिक मदत मागितली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिली. आठवडाभरात केंद्राची मदत मिळेल, अशी आशा खडसे यांनी व्यक्त केली.

या हंगामात मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागले. कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले, तर दुसरीकडे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याने तेथील पिके, फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच ३,९२५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र, नंतरही गारपिटीने राज्यातील काही भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले.

केंद्राकडे पाठपुरावा
केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले असून, येत्या दोन- तीन दिवसांत राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन त्याबाबत पाठपुरावा करणार आहे. मदत देण्याबाबत केंद्रीय स्तरावरही प्रक्रिया सुरू झाली असून आठवडाभरात ही मदत शेतकऱ्यांना मिळू शकेल, अशी आशा खडसेंनी व्यक्त केली.