आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Demolish Illegal Religious Spot After 2009 In State Mumbai High Court

राज्यातील २००९ नंतरची अवैध धार्मिक स्थळे पाडा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात सन २००९ नंतर अवैधरीत्या बांधण्यात आलेली सर्व धार्मिक बांधकामे पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रशासनाला दिले आहेत. न्यायमूर्ती ए.एस. ओका आणि ए.के. मेनन यांनी 'सोसायटी फॉर फास्ट जस्टीस' या एनजीओच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे आदेश दिले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने मे, २०११ मध्ये अवैध धार्मिक बांधकामे अधिकृत करणे, स्थलांतर व हटवण्याबाबत आदेश जारी केला होता. त्यानुसार सप्टेंबर २००९ नंतर बांधलेली सर्व अवैध बांधकामे पाडली जाणार होती.

पुढे वाचा.. ध्वनि प्रदूषण तक्रारींसाठी यंत्रणा विकसित करा : कोर्ट