आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एक तारखेलाच मिळणार आता निराधारांना पेन्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचा पगार ज्याप्रमाणे बँकेच्या खात्यावर 1 तारखेला थेट ऑनलाइन जमा होतो, त्याच धर्तीवर आता निराधार, विधवा, अपंग यांची पेन्शन 1 तारखेला थेट त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन जमा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा कार्यक्रम हाती घेतला असून या प्रकल्पामध्ये औरंगाबादसह राज्यातील 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.


शासनाने देशात विविध योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये मुंबई, उपनगर, रत्नागिरी, पुणे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, लातूर, जालना, वर्धा, अमरावती व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. राज्यातील संजय गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजनेमधील लाभार्थींना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे निवृत्तिवेतन देण्याची अंमलबजावणी 1 जुलै पासून सुरू झाली आहे.