आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deputy Chief Minister Apologize For His Wrong Statements

\'राज्‍यातील जनतेने मला माफ करावे\', अजित पवारांची सपशेल माघार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अर्वाच्‍य भाषेत दुष्‍काळग्रस्‍तांची थट्टा करणारे राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुस-यांदा माफी मागताना आपले वक्‍तव्‍य राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती. जनतेने मला माफ करावे, असे म्‍हटले आहे.

'दुष्‍काळग्रस्‍तांची थट्टा करण्‍याचा आपला कोणताच हेतू नव्‍हता. राज्‍यातील जबाबदार व्‍यक्‍ती या नात्‍याने मी असे वक्‍तव्‍य करायला नाही पाहिजे होते. राजकीय जीवनातील माझी ही सर्वात मोठी चूक आहे. मी महाराष्‍ट्रातल्‍या जनतेची माफी मागतो. मला त्‍यांनी माफ करावे,' असे अजित पवारांनी संध्‍याकाळी पत्रकारांशी बोलताना म्‍हटले.