Home »Maharashtra »Mumbai» Devdasi Certificate Issuing By Government

देवदासींना मिळणार सरकारी ओळख

प्रतिनिधी | Feb 24, 2013, 01:34 AM IST

  • देवदासींना मिळणार सरकारी ओळख

मुंबई - स्वत:ची ओळख मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा देणार्‍या देवदासींना आता ओळख मिळणार आहे. या महिलांना त्या कायमस्वरूपी देवदासी असल्याचे प्रमाणपत्र महिला व बाल कल्याण विभागाकडून देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. या प्रमाणपत्रामुळे नोकरी, मुलांच्या लग्नासाठी अनुदान, पेन्शन तसेच अन्य सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच काढला जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

राज्यात सध्या असलेल्या 8 हजारहून अधिक देवदासींपैकी वयाची चाळिशी उलटलेल्या 3 हजार 900 देवदासी आहेत. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांत सर्वाधिक देवदासी महिला असून त्यांना 600 रुपये पेन्शन सरकारतर्फे देण्यात येते. मात्र, देवदासी असल्याचे प्रमाणपत्र नसल्याने अनेक महिलांना ही पेन्शन मिळत नाही, अशी माहिती संवेदना या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा साधना झाडबुके यांनी दिली. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला तसेच अन्य कोणतेही कागदपत्रांची मागणी न करता केवळ निवडणूक ओळखपत्र पाहून देवदासी असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे नोकरी, नवीन योजना, मुलींना लग्नासाठी अनुदान मिळू शकेल, असेही झाडबुके यांनी सांगितले.

देवदासी प्रथा निर्मूलन कायदा 2005 मध्ये आला. त्याची अंमलबजावणी 2008 पासून सुरू झाली. त्यानुसार ‘देवदासी नियंत्रण मंडळ’ करणे गरजेचे होते. परंतु अद्याप समिती स्थापन झाली नाही. त्यामुळे देवदासी महिलांचे प्रश्न समजून घेता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

Next Article

Recommended