आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : देवदासीच्या मुलीची अमेरिकेत ‘भरारी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील ‘रेड लाइट एरिया’ असलेल्या कामठीपुर्‍यातील एका देवदासीच्या मुलीने अमेरिकेन महाविद्यालयाची शिष्यवृती मिळवून नवा आदर्श निर्माण केला आहे. श्वेता कट्टी असे या अठरावर्षीय मुलीचे नाव आहे. तिची आई वंदना हिने सभोवतलच्या वातावरणाचा जराही परिणाम मुलीवर होऊ न देता तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. पालिका शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर श्वेताला ‘अपने आप’ या सामाजिक संस्थेने मदत केली. अमेरिकेतील लिबरल आर्ट्स बार्ड कॉलेजने दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे तिथे जाऊन मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे तिचे स्वप्न साकार झाले आहे. श्वेता नुकतीच अमेरिकेला रवाना झाली..!