आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नद्यांच्या दोन्ही बाजूला हरित पट्टा विकसित करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
मुंबई - नमामी चंद्रभागा अभियानात नदीच्या उगमापासून ते नदी व शहरापर्यंत हरित पट्टा विकसित करण्याबरोबर नदीत सोडले जाणारे सांडपाणी, नागरी घानकचरा आदी बाबींचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरी विकास होत असतांना पर्यावरण संतुलनासाठी व सौंदर्यीकरणासाठी नदीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वनीकरण व फळबागा लावण्यावर भर देण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
 
नमामी चंद्रभागा प्राधिकरणाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम, महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, राज्यमंत्री विजय देशमुख, राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, नगरविकास प्रधान सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर, आमदार प्रशांत परिचारक, पुण्याचे विभागीय आयुक्त  चंद्रकांत दळवी, निरीचे संशोधक तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 
नद्यांना प्रदुषित करणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगरविकास विभागाच्या नियतव्ययातून नाला इंटरसेप्शन आणि एसटीपीसाठी 97 कोटी रूपये खर्च करण्याची मान्यता मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी या बैठकीत दिली. भिमा नदीच्या काठावरील साखर कारखान्यातील दूषित पाणी नदीत जात असल्याने त्यावर ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम तयार करून ते मध्यवर्ती प्रणालीला जोडण्यात आली आहे. त्याचबरोबर कचऱ्यांचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट करण्याचे आराखडे तयार करून त्याची अंमलबजावणी वेळेत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बातम्या आणखी आहेत...