आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना 40 लाख रुपये अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 24 प्रभागांसाठी 100 कोटींचा निधीही देण्यात येणार असून पूर्वी प्रत्येक नगरसेवकांना मिळणारा 60 लाख रुपयांचा विकासनिधी कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबईतील नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डमधील विकासकामांसाठी वर्षाला सव्वा कोटी रुपये इतकी घसघशीत रक्कम उपलब्ध झाली आहे.
पालिकेच्या 26 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प बुधवारी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये नगरसेवकांच्या विकास निधीमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली; परंतु नगरसेवकांचे मानधनही 10 हजारांवरून 25 हजार रुपयांवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बृहन्मुंबई पालिकेत 227 सदस्य असून त्यांना 1 कोटी रुपये विकासनिधी मिळत होता; परंतु पूर्वीचे आयुक्त सुबोधकुमार यांनी पालिकेची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी विकासनिधीला पूर्ण कात्री लावली होती. त्यामुळे नगरसेवकांना केवळ 60 लाख रुपये नगरसेवक निधी प्राप्त होत होता. पूर्वीप्रमाणे 1 कोटीचा विकासनिधी मिळावा, अशी सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी होती. त्यासाठी अर्थसंकल्पाची मंजुरी रोखून धरण्याची तयारी नगरसेवकांनी केली होती.
सध्या बृहन्मुंबई पालिकेच्या नगरसेवकांना 60 लाख रुपये नगरसेवक निधी मिळत होता. त्यामध्ये आता 40 लाख रुपयांची अतिरिक्त वाढ झाली असून 24 प्रभाग समित्यांसाठी 100 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता बृहन्मुंबई पालिकेतील प्रत्येक नगरसेवकास विकासकामांसाठी सव्वा कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.