आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendr Phadanvis Government Scraps Controversial Mumbai Development Plan

वादग्रस्त मुंबई DP ला केराची टोपली, राज ठाकरेंनी केले CM चे अभिनंदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महानगर पालिकेने तयार केलेल्या मुंबईच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने केराची टोपली दाखवली आहे. या आराखड्या संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. राज्य सरकार नियुक्त समितीनेही या आराखड्यातील अनेक दुरुस्त्यांची गरज असल्याचे मत नोंदवले होते. आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून पुढील चार महिण्यात सुधारित आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
विकास आराखडा काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात तयार करण्यात आला होता. यात अनेक त्रुटी असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांचे म्हणणे होते. मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना - भाजप युतीने वेळेवेळी आराखडा रद्द करण्याची मागणी केली होती. 2034 पर्यंत मुंबईच्या विकासाचा हा प्रस्तावित आराखडा होता. राज्य सरकार नियुक्त स्वाधिन क्षत्रिय यांच्या समितीने या आराखड्यात अनेक सुधारणांना वाव असल्याचे मत नोंदवले होते.
शहर नियोजन तज्ज्ञांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सुधारित आणि चांगला आराखडा चार महिन्यात तयार होऊ शकतो. त्यापेक्षाही दोन महिने जास्त लागले तरी चालतील पण मुंबईकरांच्या सोयी - सुविधा लक्षात घेऊन आराखडा तयार केला जावा अशा आपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे.