आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Devendra Bhubal Appoint At Information And Administration Department

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहिती संचालकपदी देवेंद्र भुजबळ नियुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती व प्रशासन)पदाचा पदभार देवेंद्र भुजबळ यांनी मंगळवारी स्वीकारला.यापूर्वी ते नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक होते. भुजबळ यांनी यापूर्वी कोकण विभागाचे उपसंचालक, मंत्रालयात उपसंचालक (वृत्त), रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. पुणे विद्यापीठात त्यांना ‘प्रोफेसर एल.एम.गोखले फेलोशिप’ मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी मिळवली.

त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ‘भावलेली व्यक्तिमत्त्वं’ हे भुजबळ यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून त्यांनी विविध विषयावरही लेखन केले आहे.