आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमुळे देशाचे दोन लाख कोटींचे नुकसान - देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संसदेच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणत काँग्रेसने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असलेले जीएसटी िवधेयक रोखून धरले. यामुळे देशाचे २ लाख कोटी, तर राज्याचे २० हजार कोटींचे नुकसान होणार आहे. गांधी परिवाराच्या िहताच्या पलीकडे काँग्रेस देशहिताचा िवचार करू शकत नाही, हेच यावरुन िसद्ध होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

भाजपच्या वतीने शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून संसदेतील काँग्रेसच्या भूमिकेचा िनषेध करण्यात आला. फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकांमधील दारुण पराभव काँग्रेस अजूनही पचवू शकलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील आर्थिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पावले उचलली होती. जीएसटी िवधेयक त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार होते. पण मोदींना या साऱ्याचे श्रेय िमळेल, या भीतीने त्यांनी संसदेचे कामकाज होऊ िदले नसल्याचा अाराेप मुख्यमंत्र्यांनी केला.
संसदेत अभूतपूर्व गाेंधळ
ललित मोदीप्रकरणी सुषमा स्वराज तसेच अरुण जेटली यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला; पण दोन्ही वेळा काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री िशवराज चौहान तसेच राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे राजीनामे संसदेत मागण्यात आले. राज्यातील घटनेसंदर्भात हे राजीनामे मागताना संसद बंद पाडण्यात आली. संसदेत असे प्रकार याआधी झाले नव्हते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसविरोधात राज्यभर १६ आॅगस्टला िनदर्शने
काँग्रेसचे संसदेतील वर्तन देशविरोधी असून त्यांच्यामुळे देशाचे िकती नुकसान झाले आहे, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या वतीने १६ आॅगस्टला राज्यभर काँग्रेसविरोधात िनदर्शने करण्यात येणार आहेत. काँग्रेस खासदारांच्या मतदारसंघातील लोकांना तुमचे गोेंधळी खासदार कसे चुकीचे वागले हे या वेळी सांगण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी िदली.

पुढील स्लाइडमध्ये, अपयशाचे खापर काँग्रेसवर : चव्हाण