आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांनी मध्‍यरात्री एक वाजेपर्यंत घेतला मंत्र्यांचा वर्ग, केली कानउघाडणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदावरुन राजीनाम्याचे पडसाद भाजपमध्ये उमटू लागले अाहे. मंत्र्यांमध्ये असलेला संभ्रम नाराजीच्या स्वरूपात बाहेर येऊ लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर आपल्या सगळ्या मंत्र्यांचा ‘वर्ग’ घेतला. ‘खडसे प्रकरणामुळे तुम्ही सर्वांनी फार काळजीपूर्वक काम केले पाहिजे. सचिव व अधिकाऱ्यांच्या सूचना डावलून फाईल्स मंजूर करता कामा नये. याचा मोठा फटका बसू शकतो’, अशा शब्दात कानउघाडणीही केली. त्यामुळे या ‘शाळे’तून बाहेर पडल्यानंतर बहुतांश मंत्र्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली.

राज्यातील जनतेला भ्रष्टाचार निर्मूलनाचा शब्द देऊन, पंधरा वर्षानंतर युतीचा सत्ता अाली. त्यामुळे सरकारच्या कामगिरीकडे सर्वांचे बारीक लक्ष आहे. मात्र अवघ्या दीड वर्षात भ्रष्टाचाराच्या अाराेपामुळे खडसेंना राजीनामा देण्याची वेळ अाली. यामुळे भाजपची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे अाता फडणवीस ताकही फुंकून पिण्याच्या भूमिकेत अाहेत. ‘एखाद्या फाईलवर सचिव व अधिकाऱ्यांनी निगेटीव शेरा मारला असेल तर तो पाॅझिटीव करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांनी धडपड करू नये. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून किंवा त्यांना अंधारातून ठेवून काही निर्णय घेतल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात काय झाले होते, याची आपल्यासमोर असंख्य उदाहरणे आहेत’, असेे फडणवीस यांनी मंत्र्यांना या बैठकीत सुनावल्याची माहिती अाहे.

पुढे वाचा, फडणवीस म्हणाले - ‘खडसेंच्या राजीनाम्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
> खडसे ‘धोकादायक’ !
बातम्या आणखी आहेत...