आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यात पेरणीला वेग, शेतकरी म्‍हणतात मान्सूनला उशीर, CM म्‍हणतात थोडं थांबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असून त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. एक ते 21 जूनअखेर राज्यात सरासरी 65.2 मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो जूनच्या सरासरीच्या 41.7 टक्के एवढा आहे. त्‍यामुळे राज्‍यात विविध जिल्‍ह्यांमध्‍ये पेरण्‍यांना सुरुवात झाली आहे. मान्‍सूनचा पाऊस उशीराने आल्‍यामुळे पिकं प्रभावित होतील, या भीतीने शेतक-यांना पेरणीही घाई आहे, दुसरीकडे घाई करू नका असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी केले आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. 15 दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात कमी - अधिक प्रमाणात पाऊस पडत असून, पावसाच्या भरवशावर शेतकरी पेरणीमध्ये मग्न झाले आहेत. पंधरा दिवसांत उस्‍मानाबाद जिल्ह्यात 56 हजार 870 हेक्टर म्हणजे 12 टक्के पेरणी झाली असून, सर्वाधिक म्हणजे 40 टक्के पेरणी लोहारा तालुक्यात झाली आहे.
उस्मानाबादसह कळंब तालुक्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्यानंतर उमरगा, लोहारा, तुळजापूर, कळंब, उस्मानाबाद, भूम, परंडा, वाशी भागात मान्सूनच्या पावसाने हळूवार एन्ट्री केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाशी, भूम तालुक्यातील अनेक गावांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे तर उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर, तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पेरणीच्या कामाला वेग आला आहे.
पुढे पाहा, राज्‍यातील पेरणीचे फोटो आणि कुठे कशी आहे पावसाची स्‍थिती..
बातम्या आणखी आहेत...