आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहमंत्री आर. आर. पाटील यांना बांगड्यांचा आहेर पाठवा- राज ठाकरेंची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘गृहमंत्री आर. आर. म्हणजे शरद पवारांची ‘कुरिअर सर्व्हिस’ आहे. महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेशी त्यांना देणं-घेणं नाही. त्यांच्याएवढा निगरगट्ट मंत्री नाही,’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आबांवर टीकास्त्र सोडले. या गृहमंत्र्यांच्या घरी समस्त महिलांना बांगड्यांचा आहेर पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारचा, विशेषकरून गृहमंत्र्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, राज्य पोलिस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांना मोकळीक द्या, मग बघा गुन्हेगारी संपते की नाही. पण, आबांसारखा माणूस गृहमंत्री असेल तर दुसरं काय होणार? आर. आर. पाटील यांना पोलिस आणि पोस्टमन यांच्यातला साधा फरक कळत नाही. असा माणूस शरद पवार यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदी बसवला आहे. महाराष्ट्रातली ‘माहिती’ दिल्लीत पोहोचवणं हेच केवळ त्यांचं काम आहे, हे केवळ पवारांची ‘कुरिअर सर्व्हिस’ आहेत. या माणसाने पोलिसांच्या बदल्या तीन महिन्यांपासून अडवून ठेवल्या आहेत. गृहमंत्र्याला स्वत:च्या मनाप्रमाणे बदली करता येत नाही, हे आबांचं गमतीशीर दुखणं आहे. या आबांमुळेच राज्यातील पोलिस खातं संभ्रमावस्थेत गेलं आहे, असा टोला त्यांनी मारला.

निगरगट्ट माणूस बदला
* परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत रोजच्या रोज धडकत आहेत. कोण कुठे काय करतोय कुणालाच समजत नाही. मुंबईतील कायदा-सुव्यवस्था ढासळण्यास आर. आर. यांची अकार्यक्षमताच जबाबदार आहे.

* मुंबईत पूर्वी रात्री महिला बाहेर पडत. आता संध्याकाळच्या वेळी बाहेर पडायला महिलांना भीती वाटते.

* राज्यातलं सरकार कधी बदलायचं ते बदलू, पण आर. आर. सारखा निगरगट्ट माणूस आजच्या आज बदलायला पाहिजे.
देवेंद्र फडणवीस यांची टीका, वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...