आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवच युतीसाठी आतुरलेले, वाचा मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कार्यकर्ते स्वबळाची भाषा करतातच. परंतु अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच होतात. उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी दरवाजा किलकिला केला नाही तर सताड उघडा ठेवला आहे. आम्हालाही युती करायची आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत युतीचे स्पष्ट संकेत दिले.
प्रश्न : पुणे येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत तुम्ही एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली होती. एकीकडे चौकशी आणि दुसरीकडे क्लीन चिट कसे ?
मुख्यमंत्री :
माझे वक्तव्य नीट ऐकले नाही. एकनाथ खडसे यांची एकूण तीन प्रकरणे होती. गजानन पाटील प्रकरणात त्यांचा हात नसल्याचे आढळून आले आहे तसेच दाऊदबरोबर संभाषणाबाबतही एटीएसने क्लीन चिट दिली आहे. फक्त भोसरी येथील एमआयडीसी जागेच्या प्रकरणाचा आरोप आहे. त्याची चौकशी करणारच आहोत. यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली जाणार असून तीन महिन्यांत ही चौकशी पूर्ण केली जाईल.

कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्टनुसार चौकशी करणार का ?
मुख्यमंत्री :
जेव्हा एखाद्या प्रकरणाची चौकशी लांबवायची असते तेव्हा कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्टनुसार चौकशी केली जाते. या चौकशीला एक-दीड वर्ष लागते. आम्हाला ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीश न्यायालयीन चौकशी करतील. त्यांना फक्त जमीन कोणाची ? ती कशी विकत घेतली ? यामघ्ये पदाचा गैरवापर केला का ? अशा दोन-तीन मुद्द्यांची चौकशी करायची आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावरही जमीन हडपण्याचा आरोप झाला आहे, त्याचीही चौकशी करणार का ?
मुख्यमंत्री :
गिरीश महाजन यांच्या जमीन प्रकरणाचा संपूर्ण अहवाल कलेक्टरनी पाठवला असून ती महार वतनाची जमीन नाही. त्यामुळे त्याची चौकशी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी निवडणूक शपथपत्रात त्याचा उल्लेख केला नाही याबाबत न्यायालयातच जाता येईल. कारण निवडणूक आयोगाच्या अखत्यारित हा प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट अशी की, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार न्यायालयही एखादी माहिती जनतेच्या हिताची आणि जनतेवर परिणाम करणारी असताना लपवली तरच त्याच्यावर विचार करते. माझ्यावरही १९९० मध्ये निवडणुक शपथपत्रात एका वकिलाच्या बदलीबाबतच्या खटल्याचा उल्लेख नसल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी या खटल्याचा निकाल माझ्या बाजूने लागला.

महानगरपालिकेसाठी शिवसेनेशी युती होणार की नाही ?
मुख्यमंत्री :
उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी दरवाजा किलकिला केला नाही तर सताड उघडा ठेवला आहे. आम्हालाही शिवसेनेबरोबर युती करायची आहे. कार्यकर्ते स्वबळावर जाण्याची भाषा करतातच. त्यांचेही कार्यकर्ते करतात, आमचेही करतात. प्रत्येकाला वाटते की, आपण काम केले त्याचे श्रेय आपल्याला मिळावे परंतु अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच केले जातात.

चीनच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार सुरु आहे तो का?
मुख्यमंत्री :
कृत्रिम पाऊस पाडण्याचे चीनचे तंत्रज्ञान अत्यंत प्रगत व अत्यंत स्वस्तही आहे. ते १०० टक्के पाऊस पाडतात. ते विमानाने ढगात फवारणी करीत नाहीत तर रडारच्या माध्यमातून रॉकेट सोडून पाऊस पाडतात. त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरण्याचा विचार आम्ही करीत आहोत. यासाठी पाच जणांना चीनमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा विचार आहे. परंतु चीन रडारचा वापर करणार असल्याने सुरक्षेच्या काणास्तव त्यांना कितपत प्रवेश द्यावा यावरही विचार सुरु आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना आपण आखलेलीच आहे. गेल्या वर्षी ज्या कंपनीला आपण कंत्राट दिले त्यांना यावर्षीकरिता पैसे द्यावेच लागणार आहेत. यंदा हवामान खात्याने पाऊस चांगला होईल असे भाकित केलेले आहे तरीही आपण ज्या ठिकाणी कमी पाऊस पडेल तेथे कृत्रिम पावसाची योजना राबवू .
पुढील स्लाईडवर वाचा या प्रश्नांवर काय म्हणाले मुख्यमंत्री....
बुलेट ट्रेनकरिता बीकेसी येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रात जागा दिली जाणार नसल्याचे म्हटले जाते हे खरे आहे का?....
या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे का......
बातम्या आणखी आहेत...