मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांवरील नाराजीमुळेच खडसे यांनी मंगळवारी मुंबईत असूनही मंत्रिमंडळ बैठकीस दांडी मारल्याचे वृत्त आहे. स्वीय सहायक(पीए) आणि स्वीय सचिवांच्या (पीएस) नेमणुकीबाबतही मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने खडसे नाराज आहेत. दरम्यान, खडसेंच्या कार्यालयाकडून मात्र प्रकृती ठीक नसल्याचे कारण देण्यात आले.
आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे स्वीय सहायक आणि खासगी सचिव राहिलेल्यांना मंत्रालयात थारा देऊ नये, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. याचा फटका खडसेंना बसला आहे. विरोधी पक्षनेते असल्यापासून खडसे यांच्याकडे शांताराम भोई हे स्वीय सहायक आहेत. सध्याही भोईच त्यांच्या कार्यालयात काम पाहत आहेत. मात्र, त्यांची महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात नेमणूक करण्याबाबतच्या फाईलवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नाही. नसल्याने खडसे नाराज असल्याचे समजते.
पुढे वाचा,खडसेंचा रामटेकवर ‘मुक्काम’...