आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadnavis Pay Homage To Balasaheb Thackeray At Shivaji Park

बाळासाहेबांचे मुंबईत भव्य स्मारक उभारणार- मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशं असं उचित स्मारक मुंबईत उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दुपारी तीनच्या सुमारास शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, विद्या ठाकूर यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे व इतरांनी उद्धव यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी ही घोषणा केली.
फडणवीस म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याविषयीचा सन्मान व आदर कायमच आमच्या मनात राहील. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सरकारच्या वतीने मुख्य सचिवांच्या नेतृत्त्वाखाली समिती नेमण्यात आली असून त्यात सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश असेल. ही समिती उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांशी चर्चा करून स्मारक कसे असावे याबाबत एक आराखडा तयार करेल. इतरांनी दिलेल्या सूचनांचाही सरकार करेल. त्यानुसार बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं अस उचित स्मारक उभारण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगत बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुढे पाहा छायाचित्रे, मुख्यमंत्री व पंकजा यांनी शिवाजी पार्कवर घेतले दर्शन...