आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadnavis The Current President Of The \'Bhartiya Janata Party

भाजपला मिळाले तरूण नेतृत्व, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली/मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आगामी निवडणूकीनंतर भाजप सत्तेवर येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची जूलमी राजवट उलथवून लावण्याचे सुतोवाच नवनियुक्त अध्यक्ष फडणवीस यांनी केले आहे.
ते म्हणाले, एकमताने निवड झाल्याचा आनंद आहे. आगामी काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार. पक्षाने दिलेले पद प्रतिष्ठेचे नाही तर, जबाबदारीचे असल्याचे सांगत ते म्हणाले, पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती योग्यपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. आगामी निवडणूकीत राज्यातून भाजपचे अधिकाधिक उमेदवार निवडूण येतील यासाठी प्रयत्न करणार आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे या दोघांनाही बरोबर घेऊन काम करणार. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हेच भाजपचे प्रश्न आहेत, ते यापुढे अधिक प्रखरपणे मांडण्याचा निश्यच फडणवीस यांनी केला आहे.
मनसेला सोबत घेणार का, या प्रश्नावर स्पष्ट उत्तर देण्याचे टाळून भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणाले, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे असा माझा प्रयत्न राहाणार आहे. ज्यांना जनतेच्या बाजूने राहायचे आहे त्यांनी आमच्या सोबत यावे. काँग्रेस-राष्ट्रवादीची जुलमी राजवट उलथवून लावण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुढील स्लाईडमध्ये वाचा,
मुंडेंचीही होती प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा ...
फडणवीसांच्या नावावर एकमत का ?