आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांग बदलला, देवेंद्रांचाही कारभार चव्हाणांसारखाच - शरद पवारांची टोलेबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने केलेल्या आडमुठेपणामुळेच राज्यात भाजपची सत्ता आली. पण सत्ताबदल होऊन काहीही फरक पडला नाही. फक्त केसांचा भांग बदलला. पृथ्वीराज चव्हाणांच्या जागी आलेल्या देवेंद्र फडणवीसांचा कारभार सीईओंसारखा आहे. तळागाळातील लोकांच्या प्रश्नांची जाण चव्हाणांना नव्हती, तशी ती फडणवीसांनाही नाही, अशी टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हाॅलमध्ये आयोजित कार्यक्रमात पवारांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्र व राज्यातील भाजप सरकार, काँग्रेस व शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारताना तेथील जमिनीवर २३ हजार घरे बांधली. ५ वर्षांपासून ती रिकामी पडून आहेत. आधी चव्हाणांना आम्ही या घरांचे गरजूंना वाटप करा, असे सांगितले होते. त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यानंतर फडणवीसांनाही घरे वाटपाची विनंती केली, पण त्यांनीही निर्णय घेतलेला नाही. या घरांविषयी १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरांचा ताबा घेतील. मी त्यांच्या मागे उभा राहीन, असा इशारा पवारांनी दिला.
पुढे वाचा...
> परदेश दौऱ्याचेही मार्केटिंग
>पवार म्हणाले, फडणवीसांना राज्यातील स्थितीचा आवाकाच नाही
>शिवसेना दोन तोंडांचे मांंडूळ
>मोदी लाट अोसरतेय
बातम्या आणखी आहेत...