आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DGP Pravin Dixit Get Angry Over Treatment To Police

पाेलिसांना घरगड्यासारखी वागणूक देऊ नका, महासंचालकांचा अधिकाऱ्यांना दम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोलिस दलातील भ्रष्टाचार आणि वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या कुटुंबीयांमार्फत कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांना नोकरासारखी दिली जाणारी वागणूक याविरुद्ध थेट पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनीच खंबीर पावले उचलली अाहेत. त्यामुळे भविष्यात या विभागातील भ्रष्टाचार पूर्णपणे बंद झाला नाही तरी किमान पोलिस कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखे वागवणे बंद केले जाईल, अशी अाशा कनिष्ठ कर्मचाऱ्यांतून वर्तवली जात अाहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या अशा गैरवापरात नाशिक शहर पोलिस आघाडीवर असल्याचेही दीक्षित यांनी पाठवलेल्या पत्रात सूचित करण्यात अाले अाहे. पोलिस कर्मचाऱ्यांचे दरबार घेऊन त्यांच्या शंका-तक्रारींचे निरसन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पोलिस कर्मचाऱ्यांचा वापर घरगड्यासारखा करून घेण्याबद्दल तीव्र नाराजी या पत्रात व्यक्त करतानाच पोलिस अधिकाऱ्यांचे केवळ पैसे कमावण्याकडे लक्ष असल्याचे स्पष्ट आणि रोखठोक मतच दीक्षित यांनी पत्रात व्यक्त केले आहे. सर्व पोलिस आयुक्त, सर्व जिल्हा पोलिस अधीक्षक, सर्व पोलिस प्रक्षिक्षण केंद्रांचे प्राचार्य आणि राज्य राखीव पोलिस दलातील सर्व १४ गटांचे समादेशक यांना दीक्षित यांच्या वतीने पोलिस महासंचालनालयातील आस्थापनेची जबाबदारी सांभाळणाऱ्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठवण्यात अाले आहे. राज्यभरातील पोलिसांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांच्या आधारावर हे पत्र पाठवण्यात आले आहे.

पत्रातील ‘चाबूक’
‘पोलिस अधिकारी वर्ग हा फक्त व्यवसाय करण्यासाठी आहे असे वाटते. कुठे पैसे मिळेल याकडेच जाे ताे लक्ष देतो. अधिकाराचा गैरवापर करताे. कनिष्ठ कर्मचारी वर्ग त्यांना घरचे नोकर वाटतात. या कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे केली जातात. किराणा अाणणे, त्यांच्या बायकोला घेऊन ब्यूटी पार्लरला, पिक्चरला घेऊन जाणे, मुलांना शाळेत घेऊन जाणे, दळण दळून आणणे, अशी कितीतरी कामे पोलिस कर्मचाऱ्यांना करावी लागतात. अधिकाऱ्यांच्या बायका तर नोकरासारखे काम करायला लावतात. या सर्व कामांसाठी शासकीय वाहने सर्रास वापरली जातात. ही कामे नाही केली तर या कर्मचाऱ्यंाना खडतर ड्यूटी लावणे, सुटी न देणे, सेवा पुस्तक खराब करून मानसिक पिळवणूक केली जाते. नाशिक शहर पोलिस आस्थापनेवर असे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतात,’ असे दीक्षित यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.