आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासाठी मंत्रिगटाची गरज नाही - धनंजय मुंडेंची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चालढकल न करता दोन दिवसात निर्णय घ्यायला हवा. िशवाय मंत्रिगटाची स्थापना करण्याचे नाटक करण्याची गरज नाही. विरोधी पक्षनेते त्यात सामील होणार नाहीत, त्याची आता गरज नाही. याविषयी राणे समितीने आधीच काम केले असून यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करून आरक्षण देता येऊ शकते, पण त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती हवी,’ अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मांडली.
मुंबईतील विधान भवनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुंडे म्हणाले, ‘अारक्षण मिळत नसल्याने मराठा समाजात असलेला असंतोष दूर करण्याएेवजी सरकार त्यांची चेष्टा करत अाहे. वेगवेगळ्या समित्यांसह मंत्रिगटाची स्थापना करण्याची घाेषणा करून केवळ मराठा आरक्षण खोळंबवून ठेवण्याचा सरकारचा डाव अाहे. शिवाय मराठा मोर्चे हे इतर समाजाच्या विरोधात असल्याचे दाखवण्याचे कारस्थानही सरकारकडूनच केले जात आहे. शिवाय ओबीसी समाजाचे आरक्षण मराठा समाज मागत आहे हे दाखवून ओबीसी आणि मराठा वाद नव्याने पेटवण्याचे हे सरकारचे मनसुबे अाहेत,’ असा अाराेपही मुंडे यांनी केला.

फक्त त्रुटी दूर करा
काँग्रेस आघाडी सरकारने ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते त्याच पद्धतीने या सरकारने आरक्षण द्यायला हवे. राणे समितीचा अहवाल सरकारकडे आहे. या अहवालातील ज्या त्रुटी न्यायालयाने काढल्या आहेत. त्या फक्त या सरकारने दूर कराव्यात,’ अशी मागणीही मुंडे यांनी केली.
संघ विचारांचा पक्ष आरक्षण काय देणार?
सत्तेत असलेला पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांचा आहे. संघ आरक्षणाविरोधात आहे. संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यांमधून संघाची आरक्षणविरोधी भूमिका िदसून आली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाविरोधात भाजप सरकारकडून केवळ टोलवाटोलवी केली जात आहे, असा अाराेप मुंडे यांनी केला.
मुख्यमंत्री हतबल
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हतबल आहेत. कोपर्डी बलात्काराविरोधात राज्यभर जनक्षोभ दिसून येत आहे. या घटनेनंतर तीन महिन्यांत आरोपींना फाशीची शिक्षा होईल असे आश्वासन दिले गेले. मात्र या प्रकरणी अजून आरोपपत्रही दाखल झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही, असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
पुढील स्लाइडमध्ये,
> मराठा मोर्चांनी दलित समाज भयभीत : भालचंद्र मुणगेकर
> अोबीसींच्या आरक्षणाची सरकारने न्यायालयीन चौकशी करावी
बातम्या आणखी आहेत...