आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhananjay Munde Blamed Minister Pankaja Munde In State Legislature Council

मुंडे विरुद्ध मुंडे : धनंजय यांच्या आरोपांच्या फैरी, पंकजांची बचावाची ढाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सभागृहात पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण खात्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्याला मंत्री पंकजा मुंडे यांनी बचावाची ढाल केली. कुणी कितीही आरोप करो, पण आपण खंबीरच असल्याचे पंकजा यांनी सांगितले.

भ्रष्ट मंत्र्यांची न्यायालयीन चौकशी करा : धनंजय मुंडे
विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या २६०व्या प्रस्तावावर परिषदेत घमासान चर्चा झाली. त्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मागणी केली की, महिला व बालकल्याण खात्यातील सर्व भ्रष्टाचारांची हायकाेर्टाच्या जजमार्फत चौकशी केली जावी. ताेवर मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा.

मुंडे म्हणाले, ई-निविदा प्रक्रियेविना बालकांसाठी अपायकारक चिक्की, बिस्किटे, वॉटर फिल्टर, चटयांसह २१ वस्तूंची २०६ कोटींची खरेदी एका दिवसात करून संबंधित खात्याने भ्रष्टाचाराचा विक्रम केला. शिक्षण विभागातील १९१ कोटींची अग्निशमन यंत्रे, खादी -ग्रामोद्योग खात्याची ३ कोटींच्या पुस्तक खरेदीची चौकशीची हायकोर्ट न्यायाधीशांकडून व्हावी, ही मागणी धनंजय मुंडेंनी केली.

पुढे वाचा.. कितीही आरोप करा, छळा; पण मी खंबीर : पंकजा