आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकांचे ऐकून फसलो : धनंजय मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘बीड जिल्हा बँकेने सहा संस्थांना केलेले 35 कोटींचे कर्जवाटप काकांच्या सांगण्याने झाले होते. काकांचे ऐकून आम्ही सर्व संचालक फसलो, भाजप आमदारांनो तुम्ही तरी सावध व्हा,’ अशी कैफीयत बुधवारी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मांडली.

बीड जिल्हा बँकेच्या बेकायदा कर्जवाटप प्रकरणातील फरारी आरोपी विधान परिषदेत उपस्थित कसे, याविषयी विनोद तावडे यांनी बुधवारी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर खुलासा करताना राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित म्हणाले की, मुख्य आरोपी बँकेचा अध्यक्ष राजाभाऊ मुंडे आहे. गोपीनाथ मुंडे यांचा तो उजवा हात आहे. पंडित यांनी गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेताच भाजप सदस्यांनी गोंधळास सुरुवात केली. मुंडे यांचे नाव नोंदीतून काढण्याची मागणी केली. ‘गुन्ह्याशी संबंधित व्यक्तीचे नाव सभागृहात उच्चारता येते,’ असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. गोंधळ वाढल्याने सभागृह तहकूब केले.

सभापतींनी धनंजय मुंडे यांना खुलासा मांडण्यास परवानगी दिली. त्या वेळी धनंजय म्हणाले, ‘जगमित्रनागा सूतगिरणीने 12 कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचे 12 कोटी व्याज अदा केलेले आहे. कर्ज देणार्‍या बँकेला टाळे लागले. त्यामुळे व्याज थकीत राहिले, पण त्यात आरोपी कसे? बीड जिल्हा बँकेने 6 संस्थांना 35 कोटींचे कर्ज दिले, ते निव्वळ काकांच्या इशार्‍याने. जगमित्रनागा सूतगिरणीवर बेकायदा कर्जप्रकरणी गुन्हा नोंद झाला; पण पंकजा मुंडे-पालवेंशी संबंधित असलेल्या सोलापूर येथील डेंटल कॉलेजला का नामानिराळे साडले,’ असा सवालही त्यांनी विचारला.

याप्रकरणी 53 दोषींवर गुन्हे आहेत. त्यापैकी 48 आरोपी भाजपचे पदाधिकारी असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली.