आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांना दोन दिवसांत भरपाई द्या, अन्यथा अांदाेलन, धनंजय मुंडेंचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटीचे १८२७ कोटी रुपये राज्य शासनाने अजून दिले नसून, विम्याची रक्कमही दिलेली नाही. सरकारने शेतकऱ्यांची ही रक्कम दोन दिवसांत द्यावी, अन्यथा राष्ट्रवादीतर्फे राज्यात आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिला.

२०१४ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यातील २६ जिल्हाधिकाऱ्यांनी ४८०३ कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात सरकारने केवळ चार हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, त्यापैकी ३४३७ कोटीच देण्यात अाले’, असे मुंडे यांनी सांगितले. जानेवारी ते मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई अजूनही मिळालेली नाही. तसेच पिक विम्यापोटी शेतकऱ्यांनी २२५ कोटी रुपये भरले असून त्यांच्या विम्याची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सचिव दर्जाचे अधिकारी नेमूनही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला मदत देण्याबाबत विलंब होत अाहे. सहा महिन्यात राज्यात १५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणात ४८ तासात सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचा शासनाचा निर्णय असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही, असा अाराेपही मुंडे यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...