आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhananjay Munde Win Maharashtra Vidhan Parishad Election

विधान परिषद निवडणूकीत धनंजय मुंडेंनी मारली बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधन परिषदे सदस्यत्वासाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांचा 59 मतांनी पराभव केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी दिड वर्षांपूर्वी काकांची आणि भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते निवडणूकीला सामोरे गेले. तेव्हा ही लढत काका-पुतण्यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपने या निवडणूकीत अधिकृत उमेदवार उभा केला नसला तरी गोपीनाथ मुंडे यांनी त्यांची सर्व ताकत काकडे यांच्या विजयासाठी वापरली होती. त्यामुळे काका गोपीनाथ मुंडे यांना धनंजय यांनी मात दिल्याचे मानले जात आहे.