मुंबई- राज्यात निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चांबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून वादग्रस्त कार्टून छापून आले. त्यामुळे शिवसेनेवर टीका होताना दिसत आहेत. ‘सामना’ने जे व्यंगचित्र छापले, त्यामुळे शिवसेनेची भूमिका समोर आली. या व्यंगचित्रामधून मराठा समाजाच्या, शहिदांच्या, पोलीसांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे सरकारने ‘सामना’वर कारवाई करावी अशी मागणी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
काय म्हणाले मुंडे :-
मोर्चे काढणारा मराठा समाज हा प्रामुख्याने शेतकरी समाज आहे. त्यामुळे शेतकरी समाजाला ख-या अर्थाने आरक्षणाची गरज आहे. सरकारने आरक्षण दिले नाही, म्हणून मराठा समाजाचा रोष दिसत आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी मांडले. मराठा अरक्षणासंबंधी शासनाने दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी, समाजाचा अंत पाहू नये; असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला आहे. कोपर्डीच्या प्रकरणात अजूनपर्यंत चार्जशीट दाखल नाही. त्यामुळे सरकार ही काय थट्टा चालवत आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आरक्षण देण्यासाठी कायद्यात काही बदल करण्याची गरज असेल तर, आम्ही विरोधी पक्ष म्हणून पाठिंबा देण्यास तयार आहे, असेही मुंडे म्हणाले.
पुढेे वाचा, याच प्रकरणावर काय म्हणाले, राधाकृष्ण विखे-पाटील..