आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण देणार्‍या पक्षालाच विधानसभेत मतदान : बंडगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आरक्षणाचा तिढा न सुटल्यामुळे धनगर समाजाने आता मुंबईत आपली शक्ती दाखवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शुक्रवारी राजधानीत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये लाखो समाजबांधव शेळ्या-मेंढ्यांसह पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. आरक्षणाच्या मागणीस जो राजकीय पक्ष पाठिंबा देईल, त्यालाच धनगर समाज मतदान करेल, अशी माहिती कृती समितीचे ललित बंडगर यांनी दिली.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाने 26 जुलै रोजी चर्चा केली होती. तोडग्यासाठी त्यांना आठ दिवसांची मुदत मागितली होती. शुक्रवारी ही मुदत संपत आहे, त्यानंतर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे धनगर समाज आरक्षण कृती समितीचे नवनाथ पडळकर यांनी सांगितले.

या मोर्चात किमान दहा लाख लोक सामील होतील. आदिवासींप्रमाणे आपली संस्कृतीसुद्धा वेगळी आहे ते दाखवण्यासाठी गजीनृत्ये, ढोल, घोंगडे, काठी, मेंढरे, शेळ्या यांच्यासह लोक मोर्चात सहभागी होणार आहेत.