आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhangar Community Reservation And Election, News In Marathi

धनगर समाजाचा मतदानावर बहिष्कार, आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासंदर्भात राज्य शासन निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ आगामी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय धनगर समाज पुढील आठवड्यात चौंडी येथील परिषदेत घेणार आहे. आरक्षण संघर्ष समितीचे नेते हनुमंत सूळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

धनगर समाजाची लोकसंख्या राज्यात दीड कोटीवर असून ५७ ‍विधानसभा मतदारसंघात हा समाज निर्णायक ठरतो. या समाजाने आजपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीची कायम पाठराखण केली. मात्र, आमची आरक्षणाची मागणी होत नसल्यामुळे यावेळी आम्ही मतदानांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाप्रत आलो आहोत, असे सूळ म्हणाले.

सध्या तरी आमच्या मागणीस महायुतीचा पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही मतदानावर एक तर बहिष्कार घालू किंवा महायुतीला एकगठ्ठा मतदान करु. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय चौंडी (जि. नगर) येथील बैठकीत पुढील आठवड्यात घेणार असल्याचे सूळ म्हणाले.

एक सप्टेंबरला आंदोलन
राज्य शासन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस चालढकल करत असल्याचा निषेध करण्यासाठी १ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर काळ्या फिती लावून मोर्चे काढणार आहे.

महायुतीला सहकार्य
महायुतीच्या नेत्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत हा समाज महायुतीला पाठिंबा देईल, असे आरक्षण समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी सांगितले.