आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhansabah Adhiveshan Dhangar Reservation Issue

विधानसभा गॅलरीतून पत्रके भिरकावत मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस (फाइल फोटो) - Divya Marathi
सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस (फाइल फोटो)
मुंबई - धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचा संताप व्यक्त करत मंगळवारी चार युवकांनी विधानसभा गॅलरीतून पत्रके भिरकावत मुख्यमंत्र्यांच्या विरोधी घोषणा दिल्या. या मुद्द्याची दखल घेत सरकारने या प्रश्नात जातीने लक्ष घालावे असे निर्देश अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले.

धनगर आरक्षणाच्या मुद्द्याचे पडसाद मंगळवारी पुन्हा एकदा विधिमंडळात उमटले. विधानसभेच्या गॅलरीत बसलेल्या चार युवकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत पत्रके भिरकावल्याने उडालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृह सुरू होताच विरोधकांनी सरकारला घेरण्याची संधी साधली. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने आपल्याला फसवले गेल्याची भावना धनगर समाजात निर्माण झाली आहे.

त्यामुळे ही अस्वस्थता अाता सभागृहापर्यंत येऊन पोहोचली अाहे. ही बाब ध्यानात घेऊन अध्यक्षांनीआश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकारला निर्देश द्यावेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील म्हणाले.

शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनीही ही भूमिका मांडली. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आपला या सरकारने विश्वासघात केल्याची भावना संपूर्ण धनगर समाजात निर्माण झाली असून सरकार विरोधातला रोष राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांत आपल्याला पाहायला मिळत अाहे. एकीकडे दुष्काळामुळे राज्यातील जनतेत असंतोष असून आता आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही विशिष्ट समाज घटकात संताप व्यक्त होत आहे.’ अशाच पद्धतीने सरकारचा कारभार राहिला तर भाजपच्या लोकप्रतिनिधींना राज्यात फिरणे मुश्किल होऊन बसेल. धनगर आरक्षणाचा निर्णय लवकर घेण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, असे अजित पवार म्हणाले.

सभागृहाच्या भावना लक्षात घेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी धनगर आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लावावा असे निर्देश सरकारला दिले. सोबतच मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबाबतही सरकारने पावले उचलावीत, असेही अध्यक्ष म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये,
>> राष्ट्रवादीचे अामदार अमरसिंह पंडित यांनी टाेचले शिक्षक अामदारांचे कान