आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dhanjay Munde Met Raj Thakare For The Assembly Council Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनंजय मुंडेंचा विधान परिषद निवडणूकीतील विजयासाठी राज ठाकरेंकडे क्षेत्ररक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्व पक्षांना जवळ घेऊन निवडणूक जिंकण्याचे काका गोपीनाथ मुंडे यांचे तंत्र पुतणे धनंजय मुंडे यांनीही अवलंबले आहे. विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विजयाकडे पहिले पाऊल टाकले. या भेटीत राज ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीत तटस्थ राहाण्याचा निर्णय घेतला आहे.


धनंजय मुंडे भाजपच्या तिकिटावर विधानपरिषदेत गेले होते, परंतु काकांशी पटेनासे झाल्यावर त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेसाठी 2 सप्टेंबरसाठी निवडणुक होत आहे. राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांनाच तिकीट दिले असून काँग्रेससह आघाडीतील अन्य अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी काका गोपीनाथ मुंडे यांनी गडबड करू नये म्हणून धनंजय मुंडे काळजी घेत आहेत. बुधवारी सकाळी धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीत मदत करण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले. राज ठाकरे यांनी त्यांना थेट समर्थन करण्याऐवजी तटस्थ राहण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे मदतच केली आहे.