आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ म्हणाले- भाजीपाल्या नंतर आता कडधान्य मुक्तीची गरज; ठाण्यात धान्योत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रामुख्याने कोरडवाहू कडधान्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या होत आहेत.  आपल्या शतमळाला बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे.   त्यामुळे भाजीपाल्या प्रमाणेच कडधान्य  नियमनमुक्त करण्याची गरज असून त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना प्रस्ताव देणार असल्याचे संकेत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.

कडधान्य विक्रीला कायद्याने बंदी असून ती रद्द होणे गरजेचे आहे. कडधान्य नियमनमुक्त झाल्यास शेतकरी आपला माल व्यापाऱ्याकडे घेऊन न जाता त्याची थेट सरकारी व्यवस्थेतून विक्री करू शकेल. त्यातून उरलेल्या मालाची शेतकऱ्याला विक्री करू शकेल असेही पणमंत्री खोत यांनी  दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.  नाम फाऊंडेशन आणि संस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील गावदेवी मंदिर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटनानंतर ते बोलत होते.
 
मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी धान्योत्सव
नाम फाऊंडेशन च्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भातील  शेतकऱ्यांना  नुसताच दिलासा  न देता त्यांची कडधान्ये थेट शहरात विक्रीला आली. कडधान्य उत्पादकाला थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी हा फार मोठा दुवा आहे.  यासाठी भाजीपल्याप्रमाणे कडधान्य शहरातील ग्राहकांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी मी उद्या मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. त्याच प्रमाणे कडधान्य नियंमनमुक्तीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पणन विभागाला देणार असल्याचे खोत यांनी स्पस्ट केले.

 कडधान्याबाबत उपाययोजना हवी
नाम फौंडेशनने गेल्यावर्षी मराठवाड्यात ५०० किलोमीटरपेक्षा जास्त जलसंधारणाची कामे केली. चांगला पाऊस झाल्याने तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने तो विफल्यग्रत झाला आहे. गारपिटीच्या तडाख्याने बाहेर पडलेला माल सडण्याची भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बघता भाजीपाल्याप्रमाणे कडधान्य विक्रीची मुभा शेतकऱ्यांना मिळण्याची गरज नाम फौंडेशन चे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.
 
धान्य महोत्सव पहिल्यांदाच
ठाण्यात गेल्या दहा वर्षापासून आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या वर्षी मराठवाडा , विदर्भ येथील शेतकरायचे कडधान्य विक्रीला  ठेवण्यात आले आहे. 1 ते 4 मे दरम्यान गावदेवी मंदिर आणि नंतर 6 ते 10 मे या कालावधीत पाटलीपडा येथे विक्री करण्यात येणार आहे
बातम्या आणखी आहेत...