आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ground Report: राज्यातील पहिल्या ‘कॅश’लेस धसई गावाची ‘कार्ड’लेस व्यथा, रोखीने व्यवहाराकडे कल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ ७% खातेदारांकडे  एटीएम कार्ड - Divya Marathi
केवळ ७% खातेदारांकडे एटीएम कार्ड
धसई - राज्यातील पहिले कॅशलेस गाव म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटन केलेले ठाणे जिल्ह्यातील धसई गाव सध्या डेबिट कार्डांची कमतरता आणि ठाणे जिल्हा बँकेतील नोटांची टंचाई यामुळे त्रस्त आहे. गतिमान कारभार आणि पारदर्शक व्यवहार या भूमिकेतून केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. त्यानंतर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने धसई या आदिवासीबहुल दुर्गम गावापासून कॅशलेस व्यवहारांच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांनंतर धसई पुन्हा कॅशकडे वळली आहे. धसईतील दोन बँकांत मिळून २४ हजार ७०० खातेदार आहेत, परंतु अवघ्या ७ टक्के लोकांकडेच एटीएम-डेबिट कार्ड आहेत. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून अवघ्या ९५ किलोमीटर अंतरावरील धसई गाव. ठाणे, पुणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले.  पाच हजार लोकसंख्येचे धसई भोवतालच्या सात-आठ वाड्यापाड्यांची महत्त्वाची बाजारपेठ. आदिवासीबहुल लोकवस्तीने वेढलेले. बँकिंग व्यवहार वाढले तर येथील चलनवलन वाढेल आणि विकासाला चालना मिळेल, या उद्देशाने सावरकर स्मारकाच्या वतीने बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून या गावात कॅशलेस व्यवहारांना सुरुवात झाली. एक डिसेंबरला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धसईतील गुरुकृपा ट्रेडिंग या दुकानातून कार्ड स्वाइप करून १ किलो तांदळाची खरेदी करत ‘रोखमुक्त धसई’चे उद््घाटन केले. त्यासाठी धसईतील शंभर व्यापाऱ्यांना एकत्र करण्यात पुढाकार घेतलेले स्वप्निल पातकर डेबिट कार्डांच्या टंचाईने चिंतित आहेत.
 
कार्डांची संख्या ५० टक्क्यांहून कमी
एकूण बँक खातेदार २४,७००
- {ठाणे जिल्हा बँक-२३ हजार {विजया बँक - १७००)
एकूण कार्डधारक १,७७४
- {ठाणे जिल्हा बँक १२७४ {विजया बँक ५००)
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
> रोखीने व्यवहाराकडे कल  : बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला, त्या बँकेची शाखा अद्याप सुरू नाही
> दुकानदार, सावरकर, व्यापारी, माजी सरपंच आणि शाखा व्यवस्थापक, विजया बँक यांच्या प्रतिक्रिया... 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...