आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिमांस नोकरी नाकारणा-या कंपनीने कर्मचा-यांना दिले होते फ्लॅट, कार भेट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुबंई- मुंबईतील हरेकृष्णा डायमंड एक्सपोर्ट या हिरे निर्यात करणा-या कंपनीने धर्माच्या आधारावर एमबीए झालेल्या झिशान अली खान या मुस्लिम तरुणास नोकरी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर कंपनीचे मालक सावजी ढोलकिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सावजी म्हणाले, आपल्या कंपनीची मुंबईत तीन यूनिट्स असून तेथे 1 हजार कर्मचारी काम करतात. त्यातील 71 कर्मचारी हे मुस्लिम आहेत. आमच्या कंपनीत जात-धर्म पाहून नाही तर योग्यता पाहून नोकरी दिली जाते. आम्ही जगभर व्यवसाय करतो. अशी मानसिकता ठेऊन ना आम्ही व्यवसाय करू शकतो ना प्रगती करू शकतो. जे उमेदवार योग्य आहेत त्यांची आम्हाला गरजच आहे. त्यांना जरूर नोकरी मिळेल. हा वाद एचआर विभागातील एका नव्या कर्मचा-यामुळे घडला आहे, असे स्पष्टीकरण सावजी ढोलकिया यांनी दिले आहे.
दरम्यान, हरेकृष्णा या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानेही स्पष्टीकरण मागवले आहे. आयोगाचे अध्यक्ष नसीम अहमद यांनी म्हटले आहे की, आम्हाला याबाबत गुरूवारी तक्रार प्राप्त झाली आहे. आम्ही कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. कंपनीच्या स्पष्टीकरणानंतर कारवाईची दिशा ठरवली जाईल.
कोण आहेत सावजी ढोलकिया-
कंपनी हरिकृष्णा एक्सपोर्ट्स आणि तिचे मालक सावजी ढोलकिया यांची कहाणी खूपच रंजक आहे. 1978 मध्ये ढोलकिया यांनी जेव्हा नोकरी सुरू केली तेव्हा त्यांना महिन्याकाठी 169 रुपये पगार होता. तर आज त्यांच्या कंपनीची किंमत (नेटवॅल्यू) 6 हजार कोटी रूपये इतकी आहे. ढोलकिया सावजी काका नावाने प्रसिद्ध आहेत. ते गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील दुधाला गावचे रहिवासी आहेत.
ढोलकिया 1978 मध्ये डायमंड पॉलिशर म्हणून काम करण्यासाठी सूरतमध्ये आले होते. त्या काळात त्यांनी एक पॉलिशर काम करण्यासोबत ब्रोकर म्हणूनही काम सुरू केले होते. त्या काळात ढोलकिया Bajaj M80 मोपेड चालवत असत. मेहनती ढोलकिया यांनी आपल्या काकांकडून उसने पैसे घेऊन छोट्या पातळीवर हि-यांचा व्यापार सुरु केला. 10-12 वर्षे मेहनत व संघर्ष करून 1992 मध्ये सावजी यांनी हरिकृष्णा एक्सपोर्ट्स कंपनीची स्थापना केली.
गेल्या वर्षी कंपनीकडून कर्मचा-यांना बोनस म्हणून फ्लॅट, कार भेट
'हरे कृष्णा डायमंड एक्स्पोर्ट्स' या कंपनीने गेल्या वर्षी दिवाळीत आपल्या 491 कर्मचा-यांना कार, 503 कर्मचा-यांना ज्वेलरी आणि 207 कारागिरांना 2 बीएचके फ्लॅट बोनस (इन्सेंटिव) म्हणून भेट दिला होता. कंपनीने यासाठी 45 कोटी रुपये खर्च केले होते. या कंपनीतील कारागिरांना आणि इंजिनियर यांना सरासरी मासिक 1 लाख रूपये पगार आहेत.
पुढे छायाचित्रांतून पाहा, ऑक्टोबर 2014 मध्ये सूरतमध्ये कार व फ्लॅट वाटप कार्यक्रम....
बातम्या आणखी आहेत...