आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diamonds Nackles Worth Rs 92 Lakh Found In Shirdi Temple Donation Box

शिर्डी: साईचरणी 2 महागडे डायमंड नेकलेस प्रथमच दान, किती आहे किंमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका अज्ञात भाविकाने साईला 92 लाखांचे दान केलेले नेकलेस... - Divya Marathi
एका अज्ञात भाविकाने साईला 92 लाखांचे दान केलेले नेकलेस...
शिर्डी- शिर्डीतील साई बाबा मंदिरातील दानपेटीत हि-याने मढवलेले दोन नेकलेस आढळून आले आहेत. याची किंमत 92 लाख रूपये इतकी आहे. एका अज्ञात भाविकाने साईला हे 92 लाखांचे दोन नेकलेस दान केले आहेत. एवढे मोठे दान प्रथमच गुप्त पद्धतीने आल्याचे साई मंदिर ट्रस्टने म्हटले आहे.
साईला मिळते परदेशातून दान..
अकाऊंट विभागाचे कर्मचारी दिलीप जिरपे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मंदिरात 223 हिरे, मोती आणि रत्ने दान मिळाली आहेत. याची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त आहे.
- नुकतेच 21 एप्रिलला डोनेशन बॉक्स खोलला गेला. यात दोन नेकलेस आढळून आले. याशिवाय काही विदेशी चलनही मिळाले आहे.
- साईबाबांचे भक्त देश-विदेशात पसरले आहेत. येथे येणारे भक्त कॅश किंवा ज्वेलरीच्या रूपाने दान करतात.
- मुंबईतील ज्वेलर्स नरेश मेहता यांनी सांगितले की, यातील एक नेकलेस 6.67 कॅरेटचा आहे तर दुसरा 2.5 कॅरेटचा आहे. दोन्हींची किंमत 92 लाख रूपये आहे.
- साई बाबांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त पुढील वर्षी साई मंदिर ट्रस्ट एका मोठ्या समारंभाचे आयोजन करीत आहे.
पुढे आणखी पाहा व वाचा...