आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्‍तच्‍या घरी शस्‍त्रे ठेवलीच नव्‍हती; अबू सालेमने कोर्टात केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

मुंबई - मुंबईमध्‍ये वर्ष 1993 मध्‍ये झालेल्‍या साखळी बॉम्‍बस्‍फोटापूर्वी आपण अभिनेता संजय दत्‍त याला शस्‍त्रे दिली नाहीत वा घेतली नाहीत, असा दावा गँगस्टर अबू सालेम याने मंगळवारी डाटा कोर्टातील सुनावनीदरम्‍यान दिले. मात्र, यापूर्वीच या प्रकरणात न्‍यायालयात संजय दत्‍तविरुद्ध AK-47 राइफल बाळगल्‍याचा आरोप सिद्ध झालेला आहे. त्‍यामुळे सध्‍या तो पाच वर्षांची शिक्षा भोगत आहे.

नेमके काय म्‍हणाला सालेम

सालेम म्‍हणाला,‘‘ घटनेनंतर आपण अन्‍य आरोपींसोबत दोन ते तीन दिवसानंतर संजय दत्‍तच्‍या घरी गेल्‍याचा आरोप खोटा आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍या घरून रायफल, बंदुकीच्‍या गोळ्या आणण्‍याचा प्रश्‍नच नाही'', अशा शब्‍दांत त्‍याने आपल्‍यावरील आरोप फेटाळले. सालेम म्‍हणाला, '' पोर्तुगाल सरकारने आपल्याबाबत केलेला हस्तांतरण करार रद्द केल्यावर आपल्याविरोधात खटला चालविण्यात येत आहे, हा प्रकार नियमबाह्य आहे'' असाही युक्‍तीवाद त्‍याने केला. या केसमध्‍ये सलेम, रियाज सिद्द‍िकी, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल राशिद, ताहिर मर्चेंट आणि मुस्तफा दोसा यांच्‍याविरुद्ध सुनावणी सुरू आहे. शिवाय वर्ष 2006 मध्‍ये याकूबसह 100 जणांना या प्रकरणात शिक्षाही ठोठावली गेली आहे.

पुढील स्‍लाइड्वर वाचा, सालेम बाबत काय आहेत पोर्तुगाल सरकारच्‍या अटी....
बातम्या आणखी आहेत...