आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Different Survey Says Uddhav Tackeray Is More Favorite For Cm Post

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनाच विविध सर्व्हेत सर्वाधिक पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. चार दिवसावर मतदान येऊन ठेपले आहे. त्यामुळे विविध संस्था, वाहिन्यांनी आपापले अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली आहे. यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे सर्वच सर्व्हे सांगत आहेत. तर, मुख्यमंत्रीपदासाठी मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
एबीपी माझा-नेल्सन यांनी केलेल्या सर्व्हेत 22 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली आहे. तर 19 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना तर 14 टक्के लोकांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पसंती दिली आहे. नितीन गडकरींना 9 टक्के लोकांनी, अजित पवारांना 6 टक्के लोकांनी तर राज ठाकरेंना 5 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतानाही शरद पवारांना 3 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
'सकाळ'ने केलेल्या ताज्या सर्व्हेतही उद्धव ठाकरेंना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सकाळच्या सर्व्हेत उद्धव ठाकरेंना 22 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर अजित पवार यांना 18 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना 16, देवेंद्र फडणवीसांना 15, पंकजा मुंडेंना 7 टक्के, राज ठाकरेंना 5 टक्के, नितीन गडकरींना 4 टक्के तर, अशोक चव्हाणांना 3 टक्के लोकांनी पसंती दिली आहे एकनाथ खडसे, नारायण राणेंना प्रत्येकी 2 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
याआधी इंडिया टीव्ही, सी-व्होटर व तालिम आदी विविध संस्थांनी घेतलेल्या सर्व्हेतही भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे म्हटले आहे तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंना पसंती मिळत असली तरी शिवसेनेला त्या प्रमाणात जागा मिळताना दिसत नाहीयेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना लोकांनी पसंती दिली तरी त्यांना मुख्यमंत्रीपद हुलकावणी देऊ शकते.