आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DIG Sunil Paraskar May Suspended From Service Home Ministery Gives Report To Cm

मुंबई: मॉडेल बलात्कार प्रकरणी डीआयजी सुनील पारसकर निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र : डीआयजी सुनील पासरकर)
मुंबई- महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी डीआयजी सुनील पासरकरांना एका मॉडेलवर बलात्कार केल्याच्या आरोपप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निलंबित करण्याची शिफारस केल्यानंतर काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी त्यावर सही केली.
मागील महिन्यात मुंबईतील एका 25 वर्षीय मॉडेलने पारसकरांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणात पारसकरांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, शिवसेनेने पारसकरांची बाजू घेतल्याने यात राजकारण आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गृहमंत्री आर आर पाटील यांनी त्यांचे निलंबन करण्याबाबत महिन्याभरानंतर शिफारस केली असावी असे बोलले जात आहे. दरम्यान, चौकशी सुरु असल्याने निलंबन करण्यात यावे असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात आयपीएस दर्जाचे अधिकारी सुनील पारसकर यांनी आपल्या बलात्कार केल्याचा आरोप एका मॉडेलने केला होता. यानंतर मॉडेलने पारसकर यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर मालवाणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. सध्या नागरी हक्क संरक्षक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक पारसकर यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली होती.
त्यानंतर संबंधित मॉंडेलने आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे केली होती. पारसकर यांच्याविरोधात दिली गेलेली तक्रार मागे घे नाहीतर तुला बघून घेऊ अशी धमकी देण्यात आली होती. यानंतर संबंधित मॉडेलला संरक्षण देण्यात आले होते. याचदरम्यान, बलात्कार आरोप प्रकरणाचा अहवाल व पुरावे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांना देण्यात आला होता.
मात्र, या प्रकरणाला कायम वळण मिळत गेली. या मॉडेलचा माजी वकील रिझवान सिद्दिकी यांनी संबंधित मॉडेलने रचलेल्या बनावाबद्दल जाहीर वाच्यता करून याबाबत सीटीटीव्ही व व्हिडिओ फुटेजच कोर्टात व पोलिसांत सादर केले होते. सिद्दिकी यांनी दावा केला होता की, पारसकर यांच्यावर बलात्काराचे आरोप करून या मॉडेलला पब्लिसिटी मिळवायची होती आणि यातून ‘बिग बॉस’ या बहुचर्चित कार्यक्रमात प्रवेश मिळवायचा होता. त्यानंतर संबंधित मॉडेलने पारसकर यांनी माझ्या वकिलाला पैसे देऊन विकत घेतल्याचा आरोप केला. तसेच मला पैसे घेऊन ही केस मागे घे म्हणून वेगवेगळ्या पातळीवरून दबाव आणला जात असल्याचे मॉडेलने म्हटले होते. यानंतर पारसकर यांच्या वकिलाने त्यांची बाजू जोरकसपणे मांडून सेशन कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. पारसकर सध्या जामीनावर आहेत. महिन्याभराच्या कालावधीनंतर गृहमंत्रालयाने पारसकर यांना निलंबित करावे अशी शिफारस केली होती.
राजकारणाचा वास?- पारसकरप्रश्नी शिवसेनेने त्यांची बाजू घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वास येऊ लागल्याची चर्चा आहे. शिवसेना पारसकरांच्या मागे उभी राहिल्यानेच आघाडीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. असे असले तरी पारसकरांविरोधात आमच्याकडे भक्कम पुरावे असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे.