आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल स्वच्छतेमुळे चकाचक रेल्वेतून करा प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधाननरेंद्र माेदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाने अाता देशात चांगलाच वेग घेतला अाहे. मध्य रेल्वेने त्यापुढे एक पाऊल टाकत स्वच्छतेच्या कामाचे िडजिटल माॅनिटरिंग करण्यासाठी िवशेष तंत्रज्ञान िवकसित केले अाहे. ही उपकरणे लांब पल्ल्याच्या चार गाड्यांमध्ये एक जूनपासून लावण्यात आली आहेत.
रेल्वेची प्रत्येक बोगी सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा स्वच्छ करण्यात येते. परंतु स्वच्छतेचे काम घेतलेले ठेकेदार त्याची स्वच्छता करतातच असे नाही. अस्वच्छ रेल्वेबाबत कुठे तक्रार करायची याची प्रवाशांना माहिती नसते. त्यामुळे अशा घाणेरड्या बोगीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर अनेकदा येत असते. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन िडव्हाइस) तंत्रज्ञान िवकसित केले आहे. मध्य रेल्वेने स्वच्छतेच्या माॅनिटरिंगसाठी यापूर्वी मेसेज आणि वेबद्वारे प्रयत्न केले होते. त्याचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसून अाले. आता त्यापुढे एक पाऊल टाकत मध्य रेल्वेने डिजिटल सेन्सरचा प्रयोग सुरू केला आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीत बोगीतील आरशाजवळ लावण्यात आलेला टॅग.
या गाड्यांमध्ये सुविधा
मुंबई-मंगलोरएक्स्प्रेस, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, दादर-चेन्नई एग्मार एक्स्प्रेस आणि मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस या चार गाड्यांमध्ये स्वच्छतेचे डिजिटल मॉनिटरिंग करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपकरणे बसवण्यात आली आहेत. स्वच्छतेसाठी डिजिटल प्रयोग करण्यात मध्य रेल्वेने देशात बाजी मारली आहे.
असे काम करेल उपकरण
Áस्लीपरआणि प्रथम श्रेणीच्या बाेगीत आरएफआयडी उपकरणाचे प्रत्येकी दोन टॅग लावण्यात येणार आहेत. सफाई कर्मचाऱ्याकडे एक हँडल सेन्सर असेल. बाेगी स्वच्छ केल्यानंतर कर्मचारी त्याच्याकडील हँडल टॅगला लावेल, तेव्हा हँडलमध्ये त्याने स्वच्छ केलेल्या वेळेची बाेगीची नोंद होईल.
Áटॅग बाेगीतील आरशाजवळ लावण्यात आलेला आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याने बाेगी स्वच्छ करताच उपकरण सेन्सर करण्याचा प्रयत्न केल्यास प्रवासी त्याबाबत जाब िवचारू शकतील. रेल्वे जेव्हा आपला प्रवास पूर्ण करून अंतिम स्टेशनात पोहोचेल, तेव्हा कर्मचाऱ्याजवळील उपकरणातील डेटा तपासण्यात येईल.