आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Digital India: Google’s Wifi Service At CST Railway Stations Starts Today

मुंबई सेंट्रलवर आजपासून प्रवाशांना मोफत वाय-फाय सेवा, गुगलचे सहकार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) स्थानक (फाईल फोटो) - Divya Marathi
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) स्थानक (फाईल फोटो)
मुंबई- रेल्वे मंत्रालय व गुगलच्या संयुक्त उपक्रमाने देशातील महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवासी सुविधांच्या अंतर्गत प्रवाशांना मोफत वाय-फाय सेवा देण्याचा प्रारंभ आजपासून मुंबईत झाला. मुंबई सेंट्रल स्थानकावर ही सेवा आजपासून सुरु झाली आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात याआधी मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी अर्धा तास मोफत वाय-फाय सेवा सुरू केली होती. मात्र आता मुंबई सेंट्रल स्थानकावरील सेवा गुगल पुरवणार आहे. ही सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता मागील काही दिवसापासून सुरु होती. ही सेवा पहिल्या अर्ध्या तासासाठी मोफत असेल. त्यासाठी प्रवाशांना पासवर्ड पाठवला जाणार आहे.
डिझीटल इंडियाचा नवा अवतार
- देशातील एकून 407 रेल्वेस्थानकांवर लवकरच टप्प्याटप्प्याने वायफाय सेवा सुरु होणार
- वायफायमध्ये वेगवान स्पीड मिळेल असे गुगलने म्हटले आहे.
- गुगल यासाठी भारतात एक भलीमोठी ऑप्टिकल फायबरची लाईन टाकणार आहे. याद्वारे भारतात खासकरून ग्रामीण भारतात इंटरनेट पोहचविण्याचा प्रयत्न असेल.
- डिझीटल इंडियाच्या माध्यमातून भारत सरकारने सुरु केलेल्या या उपक्रमांतर्गत
देशातील 60 टक्के लोकसंख्या कव्हर होणार आहे. अर्थातच याला गुगलची सहाय्य असेल.
- 2016 सालात गर्दीची 100 रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या भेटीनंतर या प्रोजेक्टला गती मिळाली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिझीटल इंडियाच्या उपक्रमाला पाठिंबा देतानाच यात सहभागी होण्याचा निर्णय सुंदर पिचई यांनी घेतला आहे.
पुढे पाहा...