आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोरांचे विश्व डिजिटल लाइफच्या जाळ्यात; वाचा, सर्वेक्षणातील काही मनोरंजक नोंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उठता बसता स्मार्टफोन-सोशल मीडियाचा नाद आता महानगरांसह खेडोपाडीही पोहोचला आहे. स्मार्टफोन, विविध गॅजेट्स व सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रत्येक जण ‘कनेक्टेड’ होत आहे. त्यातही निमशहरी भागातील ‘टिनेजर्स’ म्हणजेच किशोरवयीन मुले-मुलींचे भावविश्व या ‘डिजिटल लाइफस्टाइल’मध्ये महानगरांच्या तुलनेत जास्त गुरफटले जात आहे. ‘टीसीएस’ कंपनीच्या ‘जेनवाय’ या सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले आहे. टीसीएस कंपनीने गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात आपल्या ‘आयटी विझ’ कार्यक्रमांतर्गत अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नर्ई, कोइम्बतूर, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, पुणे या जवळपास 14 शहरांमध्ये हे सर्वेक्षण केले. यात 12 ते 18 वयोगटातील उच्च माध्यमिक शाळेत शिकणार्‍या 18,196 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेऊन प्राथमिक माहिती गोळा करण्यात आली.

फेसबुकचे वर्चस्व
‘टिनेजर्स’ची सर्वाधिक पसंती एकट्या ‘फेसबुक’ या सोशल मीडियाला मिळाली आहे. 76 टक्के मुलामुलींचे फेसबुक अकाउंट आहे. 2012 वर्षात हेच प्रमाण 86 टक्के होते. त्यातही शहरी भागातील 38 टक्के टिनेजर्स दर तीन दिवसातून एकदा तरी फेसबुकवर पोस्ट करत असतात.
मित्रांचा गोतावळा वाढला : महानगरांत उच्च माध्यमिक शाळांत 53 टक्के विद्यार्थ्यांच्या तर छोट्या शहरांत 60 टक्के विद्यार्थ्यांच्या 120 पेक्षा जास्त मित्र-मैत्रिणी आहेत.

कारण काय : शहरी टिनेजर्स नवीन सोशल प्लॅटफॉर्म्स पटकन आत्मसात करतात, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा उपयोग करतात. हे निष्कर्ष टीसीएसला उद्याच्या व्यावसायिकांसोबत संवाद साधण्यासाठी व करिअर घडवण्यासाठी नियोजन करण्यात मदत करतात, असे मत कंपनीचे अजॉय मुखर्जी यांनी व्यक्त केले.

सर्वेक्षणातील काही मनोरंजक नोंदी
गुगल+ लोकप्रिय, ऑर्कुट इतिहासजमा
ट्विटर किचकट आहे, लोकप्रिय नाही.
०हायस्कूल विद्यार्थ्यांपैकी 87 टक्के जणांना सोशल मीडियामुळे वर्तमान घडामोडी समजतात असे वाटते

ऑनलाइन प्रवृत्ती
०शहरात दहापैकी सात टिनेजर्सची ऑनलाइन खरेदी
० चित्रपट तिकिटे वस्तूही ऑनलाईन