आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीपसाब यांचे सिनेसृष्टीतील योगदान महत्त्वपूर्ण : राजनाथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या भरभराटीसाठी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. दिलीपकुमार यांचे या क्षेत्रातील योगदान कधीही न विसरता येण्यासारखे अाहे,’ असे गाैरवाेद‌्गार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी काढले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अमूल्य याेगदानाबद्दल ९४ वर्षीय दिलीपकुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला हाेता. एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे रविवारी वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन राजनाथ सिंह यांनी त्यांना हा पुरस्कार देऊन गाैरवले.
राजनाथ म्हणाले, ‘दिलीपकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीसाठी दिलेले योगदान न विसरता येण्यासारखे आहे.’ मुख्यमंत्री म्हणाले की, ‘दिलीपकुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाची कामगिरी बजावत असतानाच चित्रपटसृष्टीला दिशा देण्याचे काम केले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. दोन दिवसांपूर्वीच दिलीपकुमार यांनी ९३ वा वाढदिवस साजरा केला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने दिलीपकुमार यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो, अशी प्रार्थनाही मी करतो.’
बातम्या आणखी आहेत...