आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळातील पत्रकारांसाठी आचारसंहिता : वळसे पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या महिला अत्याचारांबाबतच्या कथित विधानाचा विपर्यास करणार्‍या वाहिन्यांवर हक्कभंग आणण्यात येणार आहे. त्यामुळे आता विधिमंडळाचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांसाठी आचारसंहिता आणण्याचा विचार केला जात आहे. यासाठी विधान परिषद सभापतींशी चर्चा करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी सांगितले.

बुधवारी गृहमंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने चांगलाच गहजब माजला होता. गृहमंत्री पाटील यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे म्हटले होते. तसेच विपर्यास करणार्‍या वाहिन्यांवर हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले होते. मात्र, गुरुवारी विधानसभेत त्यांनी याबाबतचा ठराव आपण नव्हे तर आमदार आणतील, असे सांगितले. मंत्री, सदस्यांच्या विधानाचा विपर्यास करून त्यांची बदनामी होत असताना सभागृह संरक्षण देणार की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यावर वळसे पाटील म्हणाले, ‘मी पाटील यांचे विधान तपासले असता त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळेच विधिमंडळाचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांसाठी आचारसंहिता लागू करावी का याचा विचार आपण करत आहोत