आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिना वाडिया यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन, 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिना वाडिया... - Divya Marathi
दिना वाडिया...
मुंबई- पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांची एकुलती एक कन्या दिना वाडिया (वय-98) यांचे गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा नस्ली वाडिया आणि मुलगी डायना आहे. परधर्मियाशी लग्न केल्याने वडिल मोहम्मद अली जिना यांनी दिनासोबतचे सर्व संबंध तोडले होते.
 
जिना यांनी वयाच्या 42 व्या वर्षी मुंबईतील रतनबाई ऊर्फ रती या 16 वर्षीय पारशी तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या दाम्‍पत्‍याला दिना नावाची एक मुलगी झाली. पुढे रती यांचा मृत्यू वयाच्या 29 व्या वर्षी मृत्यू झाला. यानंतर दिना यांचा संभाळ त्यांची आजी म्हणजेच रतीची आई दिनबाई पिटिट यांनी केला.
 
दिना यांचे बालपण पारशी कुटुंबात गेले. दिना यांचे लहानपण हे अत्यंत चांगल्या वातावरणात गेले. पुढे दिना यांनी पारशी समुदायातील नेवील वाडिया यांच्याशी प्रेमविवाह केला. जो जिना यांना मंजूर नव्हता. मात्र, दिना यांनी आपल्या पित्याला ठणकावून सांगितले की, तुम्ही आपल्या मुलीच्या वयाच्या आणि परधर्मातील मुलीशी विवाह कसा केला होता? अखेर दिना यांनी जिना यांचा प्रखर विरोध झुगारून मुंबईतील नेवील वाडिया या उद्योगपतीसोबत प्रेमविवाह केला.
 
दिना यांनी नेवील यांच्यासोबत लग्न केल्यानंतर जिना यांनी मुलीसोबतचे सर्व संबंध तोडले. रतीच्या मृत्यूनंतर मोहम्मद अली जिना हे अधिक धार्मिक व परंपरावादी बनले. यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ होता. कारण त्याच काळात त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आणि पुढे पाकिस्तान देश जन्माला घातला.
 
दिना यांचे चिरंजीव नस्ली वाडिया हे मोठे उद्योजक आहेत. ते वाडिया समूहाचे प्रमुख आहेत. वाडिया समूह बॉम्बे डाईंग, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, गो एयर आदी उद्योग चालवतो. नेस वाडिया व जे वाडिया हे दिना यांचे नातू आहेत. 
बातम्या आणखी आहेत...